Ad will apear here
Next
पवन सिंग ‘आरटीएस’ परीक्षकांच्या अध्यक्षपदी
पुणे : इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे (आयएसएसएफ) म्युनिच येथे होणाऱ्या आयएसएसएफ रायफल-पिस्टल विश्वचषक स्पर्धेसाठी पुण्याच्या माजी नेमबाज आणि भारतीय नेमबाजी संघाचे माजी प्रशिक्षक पवन सिंग यांची रिझल्ट टाइमिंग स्कोअर (आरटीएस) परीक्षकांच्या (ज्युरी) अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या गन फॉर ग्लोरी अॅकॅडमीचे सहसंस्थापक आणि भारतीय राष्ट्रीय राइफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव असलेले सिंग या नेमणुकीमुळे वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेत ‘आरटीएस’ परीक्षकांच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ‘आरटीएस’ परीक्षकांचे अध्यक्ष या मानाच्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीकडे प्रशासकीय कामकाजाचे पालन करणे, परीक्षक सदस्यांशी समन्वय साधणे, याबरोबरच स्पर्धात्मक मोकळेपणाचा सन्मान करण्यासाठी कोणत्याही विसंगतीशिवाय तांत्रिक संचालकांना अहवाल देणे आदी महत्त्वाची कामे असतात.

भारताकडे यजमानपद असलेली नवी दिल्ली येथील २०१९ची विश्वचषक स्पर्धा आणि २०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टीने सिंग यांची ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. सिंग यांनी यापूर्वी ‘आयएसएसएफ’तर्फे २०१७मध्ये आयोजित जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे.

‘आरटीएस’ परीक्षकांचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना सिंग म्हणाले, ‘स्पर्धेतील निकाल देणे, गुणांशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे, याबरोबरच पुढील प्रक्रियेसाठी निकालाची वेळेवर माहिती देणे आदीची महत्त्वाची जबाबदारी अध्यक्षाकडे असते. नेमबाजांचे गुण आणि पदकांवर अध्यक्षाची भूमिका थेट परिणाम करते, त्यामुळे हे पद खूपच महत्वाचे आहे.’

‘यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धांमधील उपकरण नियंत्रण व्यवस्थापक, वर्ल्डकपमधील अंतिम फेरी व्यवस्थापक आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांची जबाबदारी मी सांभाळली आहे. म्हणूनच या भूमिकेचे गांभीर्य आणि महत्त्व मला माहीत असून, ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करीन,’ असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMXBO
Similar Posts
पुण्याचे पवन सिंग चीनमधील पंचांना देणार धडे पुणे : भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव, महासंघाच्या पंच समितीचे सदस्य, भारतीय नेमबाजीच्या संघाचे माजी प्रशिक्षक आणि पुण्यातील गन फॉर ग्लोरी या शूटिंग अकादमीचे सहसंस्थापक असलेल्या पुण्याच्या पवन सिंग यांची इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे (आयएसएसएफ) चीनमधील रायफल व पिस्टल
फिटनेस जागरूकतेसाठी स्क्वॉट्सतर्फे वॉकेथॉन पुणे : नागरिकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने येथील ऑनलाइन फिटनेस कन्सल्टेशन मंच ‘स्क्वॉट्स’ने नुकतेच लिफ्ट-ए-थॉन या एका वॉकेथॉनचे आयोजन केले होते. स्क्वॉट्सचे संस्थापक जितेंद्र चोक्सी यांनी झेंडा दाखवून या वॉकेथॉनची सुरूवात केली. या सहा किलोमीटरच्या वॉकमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language